Posts

नाना शंकर शेठ

आज ३१ जुलै . एका समाजसुधारकाची पुण्यतिथी ज्यांचे नाव नेहमीच दुर्लक्षित राहिले . ते म्हणजे जगन्नाथ शंकर शेठ उर्फ नाना शंकर शेठ . पुण्यतिथी निमित्त त्यांच्या कार्याच्या आठवणींचा हा केलेला उजाळा . ज्यांनी स्वतःचे सर्व जीवन समाजसुधारणेसाठि अक्षरशः खर्चून टाकले होते . 📋 बरेचसे जण हेच विचारतात की "नाना ?? कोण नाना? शंकर शेठ?? कधीचे?" .  अगदी उदाहरण च सांगायचे झाले तर "मुंबई च्या जडण घडणीचा इतिहास" या विषयावर जो लघुपट लेझर शो द्वारे गेट वे ऑफ इंडिया ला मोठया पडद्यावर मुबाईकरांना दाखवण्यात आला मागच्या वर्षीच्या महाराष्ट्र दिना दिवशी (बहुतेक १ मे २०१७) त्यात देखील नानांच्या कार्याविषयी पुसटसा उल्लेख देखील केला गेला नव्हता . विषय मुंबई जडणघडणीचा आणि तो नानांच्या छोट्याश्या ही उल्लेखाशिवाय ? खरच कमाल आहे . यु ट्यूब वर विडिओ आवर्जून पहावा . ज्यात हिंदी अँकरिंग अमिताभ जी बच्चन आणि मराठी अँकरींग नाना पाटेकर यांनी केले होते .  📋ते कार्याने कोणत्याही राजकीय पक्षाचे , संघाचे , दलाचे नव्हते वा कोण्या एका विशीष्ठ पंथाचे नव्हते . किंबहुना कोणते राजकीय पक्ष अजून निर्माणच झाले नव्...